सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! जानेवारी महिन्यात मिळणार 03 मोठे आर्थिक लाभ – थकबाकी व फरकासह होणार अदा.State Employees Salary Hike News

State Employees Salary Hike News:सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! जानेवारी महिन्यात मिळणार 03 मोठे आर्थिक लाभ – थकबाकी व फरकासह होणार अदा

राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी येणारा काळ आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा ठरणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच तीन महत्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून, हे सर्व लाभ थकबाकी / फरकासह अदा केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे.

Sharad Pawar NCP Candidate List BMC Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?

केंद्राप्रमाणे 58% महागाई भत्ता (DA) लागू होणार

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 03 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

ही DA वाढ जुलै 2025 पासून लागू केली जाणार असून, संबंधित कालावधीची थकबाकी देखील एकत्रितपणे अदा केली जाणार आहे.

सातवा वेतन आयोग उर्वरित हप्ता अदा करणेबाबत, परिपत्रक निर्गमित दि. 23.12.2025

या वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 58 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित होण्याची अपेक्षा आहे.

वित्त विभागाने दि. 08 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सहावा व सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून म्हणजेच सन 2006 पासून प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रोत्साहन भत्ता

मूळ वेतनाच्या 15% दराने

किमान ₹200 व कमाल ₹1500 या मर्यादेत

या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना 2006 पासूनची थकबाकी / फरक रक्कम मिळणार असून, चालू वेतनासोबत दरमहा ₹1500 पर्यंत प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोठी बातमी शालेय विद्यार्थ्या वार्षिक 51 हजार रुपये मिळणार. Swadhar Yojana

सुधारित वेतनश्रेणीचा (8वा वेतन आयोग) लाभ

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे आठव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय अपेक्षित आहे.

हा लाभ दिनांक 01 जानेवारी 2025 पासून प्रभावी राहणार आहे.

जरी आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी सप्टेंबर 2028 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असली, तरीही कर्मचाऱ्यांना 01.01.2025 पासून आर्थिक लाभ मिळणार असल्याने थकबाकीसह मोठा फायदा होणार आहे.

एकूणच, या तीन निर्णयांमुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेले आर्थिक लाभ अखेर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment