Municipal Elections 2025: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका?; आयोगाने बोलावली आज महत्वाची बैठक

Municipal Elections 2025: राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections 2025) घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. येत्या 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यात जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकते.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक आधी घेणं सोयीस्कर वाटत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे. (Maharashtra Election 2025)

डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती New Digital Banking Rules

सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज बैठक- (Maharashtra ECI Meeting)

राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आलेल्या हरकती आणि अडचणींबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त उपस्थित असतील. तर दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. यामध्ये सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज ही बैठक बोलावण्यात आली आहे.

महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु- (Municipal Elections 2025)

राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर मनपात आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. तुलनेत जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाचा घोळ जास्त आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे.

Digital 7/12 ला कायदेशीर मान्यता! चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुन्हा मास्टरस्ट्रोक, अवघ्या 15 रुपयांत डाऊनलोड करा, GR वाचला का? Digital 7/12 in Just 15 Rupees

प्रारुप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7452 हरकती सूचना- (BMC Election 2025)

एका दिवसात एकूण 1958 हरकती सूचना नोंदी मुंबई महापालिकेकडे दाखल करण्यात आल्या आहेत. 3 डिसेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदविण्याचा शेवटचा दिवस होता. तर अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला जाहिर करण्यात आलेल्या प्रारुप मतदान यादीवर बुधवार 3 डिसेंबरपर्यंत 7452 हरकती सूचना नोंद झाल्या आहेत.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment