Municipal Election Voter List 2025:राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर* करण्यात आला आहे. त्यानुसार, *प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर 2025 असणार आहे.*
प्रारूप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 असेल.
मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे 15 डिसेंबर आणि मतदान केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे 22 डिसेंबर 2025 असणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 ठरली होती.
त्यानंतर, ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने यादी प्रसिद्ध केली. मात्र, या यादीत घोळ असल्याने हरकती घेत निवडणूक आयोगाकडे नव्याने प्रारुप यादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला होता. त्यानुसार, नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
