T20 World Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी? संपूर्ण वेळापत्रक येथे पहा!T20 World Cup Time Table 2026

T20 World Cup Time Table 2026:टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या तारखांची आयसीसीने घोषणा केली आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.

गतविजेत्या टीम इंडियाचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध होणार आहे. मागच्या टी-20 वर्ल्ड कप प्रमाणेच यंदाही 20 टीम स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या 20 टीमना प्रत्येकी 5-5 टीमच्या 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे.

२५ नोव्हेंबर २०२५ चा हवामान अंदाज: थंडी पूर्णपणे नाहीशी; राज्यात ढगाळ हवामान कायम.IMD Cyclone Rain Alert Today

टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स या टीमचा समावेश आहे.

याआधी मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारत, पाकिस्तान, अमेरिका एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातला सामना अहमदाबादमध्ये तर भारत-नामिबियाची मॅच दिल्लीला होईल. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

चला, घर बांधायला घ्या! Home Loan वर 4 टक्के व्याज सबसिडी, मोदी सरकारचे मोठे गिफ्ट Pradhan Mantri Gramin Awas Loan Yojana

पाकिस्तानचे सामने कोलंबोमध्ये

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे त्यांचे सगळे सामना श्रीलंकेमध्ये होणार आहेत. पाकिस्तानची टीम सेमी फायनल तसंच फायनलला पोहोचली तर हे दोन्ही सामने श्रीलंकेमध्येच होतील. तसंच पाकिस्तान सेमी फायनल आणि फायनलला पोहोचली नाही, तर हे सामने भारतात खेळवले जातील.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतातल्या 5 तर श्रीलंकेतल्या 3 स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. भारतात मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलकात्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच होतील. तर श्रीलंकेत आर प्रेमदासा, सिनहलसी आणि केन्डीमध्ये सामने खेळवले जातील.

टीम इंडियाचं वेळापत्रक

7 फेब्रुवारी- भारत विरुद्ध अमेरिका, अहमदाबाद

12 फेब्रुवारी- भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली

15 फेब्रुवारी- भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो

18 फेब्रुवारी – भारत विरुद्ध नेदरलँड्स, मुंबई

Tukda Bandi Kayada : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही

या 20 टीम सहभागी होणार

भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान, युएई

t20 wc 2026 schedule 1 6925c6ce6c358 1

Leave a Comment