Pradhan Mantri Gramin Awas Loan Yojana:तुम्ही अजूनही घर बांधण्याचा विचार करत असाल आणि महागाईमुळे थांबला असाल तर आता एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. मोदी सरकारने घर बांधणाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. गृहकर्जावरील व्याजदरातही सबसिडी देण्यात येत आहे.
लग्न पहावे करून आणि घर पहावं बांधून असं आपल्याकडं म्हटलं जातं. कारण दोन्हीसाठी मोठा कस लागतो. आता वाढत्या महागाईमुळे, सिमेट, लोखंड, विट यांच्या चढ्या दरामुळे घर बांधणे हा काही तोंडाचा विषय राहिला नाही.
त्यासाठी मोठा खर्च येतो. कर्ज काढल्यावर व्याजही भरावे लागते. पण आता मोदी सरकारने एक खास योजना आणली आहे. त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. मध्यम आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील लोकांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरेल. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत आता व्याजदरावरही सबसिडी देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याने ग्रामीण भागातील घर बांधकामांना मोठा वेग येण्याची शक्यता आहे.
PMAY-U 2.0 अंतर्गत मोठा लाभ
घर खरेदीसाठी अनेकजण गृहकर्जाचा पर्याय हमखास निवडतात. पण दीर्घकाळासाठी महागडे व्याजदरावर कर्ज हफ्ते फेडावे लागतात. त्यामुळे अनेकजण घर खरेदीचा अथवा घर बांधण्याचा निर्णय कित्येक वेळा पुढे ढकलतात.
अशा लोकांसाठी मोदी सरकारने पीएम आवास योजना आणली आहे. गेल्यावर्षी 2024 मध्ये केंद्र सरकारने आवास योजना-शहरी (PMAY-U) 2.0 साठी सुद्धा मंजुरी दिली. या योजनेतंर्गत मध्यम वर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि निम्न उत्पन्न वर्गातील लोकांना पहिले घर खरेदीसाठी व्याजदरात सबसिडी देण्यात येणार आहे.
कोणाला आणि किती मिळणास सबसिडी?
PMAY-U 2.0 अंतर्गत व्याज सबसिडी मिळणार आहे. केवळ 35 लाखांपर्यंतची किंमत असणाऱ्या घरांसाठी ही सबसिडी लागू असेल. पण अशा घरासाठी तुमच्या कर्जाचा आकडा हा 25 लाख अथवा त्यापेक्षा कमी असावा. तर कर्जाचा कालावधी 12 वर्षांचा असेल तर 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4 टक्के व्याज सबसिडी मिळेल.
कोणावर मिळेल लाभ?
मध्यम वर्ग, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना, ज्याचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय या योजनेचा लाभ त्याच व्यक्तीला देण्यात येईल. ज्याचे संपूर्ण देशात कुठेच यापूर्वी घर नसेल आणि तो पहिल्यांदाच घराचा व्यवहार करत असेल.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा