CIBIL Score : सध्याच्या काळात ‘सिबिल स्कोअर’ फार महत्त्वाचा आहे. तो जर चांगला नसेल तर बँका तुम्हाला दारातही उभे करणार नाही. कर्ज देण्यापूर्वी बँका अनेक गोष्टी तपासतात, ज्यात ‘सिबिल स्कोअर’ सर्वात महत्त्वाचा असतो.
तुमचा सिबिल स्कोअर खराब असल्यास बँक तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकते किंवा खूप जास्त व्याज आकारू शकते. पण घाबरू नका! तुमचा सिबिल स्कोअर कमी असला तरी, तुमच्याकडे अजूनही काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत, जिथून तुम्ही कर्ज मिळवू शकता.
जॉईंट लोन घ्या
तुमचा सिबिल स्कोअर कमी असल्यास, तुम्ही ‘संयुक्त कर्ज’ घेण्याचा पर्याय निवडू शकता. यासाठी तुम्हाला अशा व्यक्तीसोबत अर्ज करावा लागेल, ज्याचा सिबिल स्कोअर उत्तम आहे. अशा परिस्थितीत, उत्तम सिबिल स्कोअर असलेल्या सह-अर्जदारामुळे बँक तुम्हाला कर्ज मंजूर करण्याची शक्यता वाढवते.
एनबीएफसीकडून कर्ज
जर बँक कर्ज देण्यास तयार नसेल, तर तुम्ही नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून कर्ज घेऊ शकता. एनबीएफसी कमी सिबिल स्कोअरवरही कर्ज देतात, पण यासाठी तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज दर भरावा लागू शकतो.
सध्या अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ‘अॅडव्हान्स सॅलरी लोन’ किंवा पगार अॅडव्हान्समध्ये देतात. कंपनी तुमच्या पगाराच्या आधारावर हे कर्ज देते. कर्जाची रक्कम तुमच्या मासिक पगाराच्या २ ते ३ पट असू शकते. हे कर्ज तुमच्या पगारातून आपोआप कापले जाते, ज्यामुळे सिबिल स्कोअरची अट शिथिल होते.
गोल्ड लोन घ्य
तुमच्याकडे सोने असल्यास, तुम्ही बँकेतून किंवा वित्तीय संस्थांकडून गोल्ड लोन घेऊ शकता. गोल्ड लोनमध्ये तुमचा सिबिल स्कोअर तपासला जात नाही, कारण तुम्ही सोने गहाण ठेवता. त्यामुळे ही कर्जे सुरक्षित मानली जातात आणि त्याचे व्याज दरही कमी असतात.
एफडीवर कर्ज
तुमची जर बँकेत फिक्स्ड डिपॉझिट असेल, तर तुम्ही त्या एफडीवरही कर्ज घेऊ शकता. यातही बँक तुमचा सिबिल स्कोअर तपासत नाही. कर्जाची रक्कम तुमच्या एफडीच्या रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत असू शकते. एफडीवर कर्ज घेणे हा सर्वात सोपा आणि कमी व्याज दरातील पर्याय मानला जातो.