HSRP Alert 2025: मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील एक कोटी वाहनांवर होणार कारवाई…

HSRP Alert 2025:जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले असताना, राज्यात ४७ लाख २३ हजार वाहनांनाच ‘एचएसआरपी’ बसविण्यात आली आहे. मात्र, एक कोटी आठ लाख वाहनाना ही पाठी बसविण्यासाठी वाहनधारकांनी पाठ फिरविली आहे.

वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ३० नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली असून, उर्वरित वाहनांवर कारवाई करण्याचा पवित्रा परिवहन आयुक्तालयाकडून घेण्यात आला आहे. याबाबत मंत्रालयीन स्तरावर बैठक घेऊन आठवडाभरात निर्णय घेण्यात येणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार, राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात अशी दोन कोटी ४३ लाख वाहने आहेत. ३१ मार्चपासून जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यास सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत ४७ लाख २३ हजार वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यात आली आहे. ८७ लाख १५ हजार वाहनांसाठी नोंदणी झाली आहे. मात्र, सुमारे एक कोटी आठ लाख वाहनमालकांनी नोंदणी केलेली नाही.

या पाट्या बसविण्यासाठी सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली. केंद्रांची संख्या कमी असल्याने तिसऱ्यांदा १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

परिवहन विभागाने वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असता, विरोध केल्याने परिवहनमंत्रीप्रताप सरनाईक यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीचा आदेश दिला. त्यानंतरही सुमारे एक कोटी आठ लाख वाहनांना या पाट्या बसविण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय.Land Pot Hissa Mojani

प्रमुख आरटीओंचा आढावा

आरटीओ – एकूण वाहने – ‘एचएसआरपी’ लावलेली वाहने – टक्के

मुंबई – ५,३९,४५२ – १,४६,१२५ – ३९.००

ठाणे – १०,८८,८६४ – १,९१,८११ – २४.३०

पुणे – २६,३५,१७५ – ७,२०,१२४ – ३५.०८

पिंपरी- चिंचवड – ११,८४,२८४ – ३,९५,७१७ – ४४.४८

नागपूर (शहर) – ५,९३,३५२ – १,७३,५१५ – ३३.७५

नागपूर (ग्रामीण) – ४,६४,९१६ – २,१५,१४२ – ५५.१९

नागपूर (पूर्व) – ४,९१,२११ – १,८४,८१६ – ४२.९६

नाशिक – १२,६२,२६५ – २,७७,७८७ – २४.८५

कोल्हापूर – ९,०६,५४९ – २,३७,५४२ – ४२.३५

सोलापूर – ५,४२,९१३ – २,०४,९५३ – ४८.५२

सातारा – ४,७२,६१२ – १,७७,२८२ – ४८.३०

छत्रपती संभाजीनगर – ८,०३,३५५ – २,७९,०९२ -४२.२१

एकूण वाहने – दोन कोटी ४३ लाख ५ हजार ८३२

‘एचएसआरपी’ लावलेली वाहने – ४७ लाख २३ हजार २६०

नोंदणी केलेली वाहने – ८७ लाख १८ हजार ८१२

उर्वरित वाहने – एक कोटी ८ लाख ६६ हजार ७६०

दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये 152 पदांची भरती! ऑनलाइन अर्ज येथे करा Parbhani District Bank Recruitment 2025

राज्य सरकारच्या निर्देशानुसार जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली, तरी सुमारे एक कोटी वाहनांची नोंदणी झालेली नाही.

संबंधित वाहनांवर मुदतीनंतर कारवाई करण्यात येणार आहे. मंत्रालयीन स्तरावर याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. – विवेक भीमनवार, आयुक्त, परिवहन विभाग

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment