Talathi Bharti 2025 : पुढील महिन्यात राज्यात 1700 तलाठी पदांची भरती!

Talathi Bharti 2025:राज्यात महसूल विभागातील तलाठ्यांच्या हजारो पदांवर रिक्तता निर्माण झाली असून, त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे. सध्या एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार असल्याने नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. मात्र आता राज्य शासनाने या समस्येवर उपाय म्हणून मोठी पावले उचलली आहेत.

महसूल विभागाच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ अखेर राज्यभरात १ हजार ७०० पेक्षा जास्त तलाठी पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीमुळे तलाठ्यांवरील कामाचा भार कमी होईल आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळेल. भूमी नोंदणी, ई-हक्क नकल, फेरफार, प्रमाणपत्रे अशा विविध कामांसाठी आता लोकांना तहसील कार्यालयांचे फेरे मारावे लागणार नाहीत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला.Maharashtra Cabinet Decision

पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक म्हणजे सुमारे १७०० पदे भरण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुणे हा राज्यातील महसूलदृष्ट्या सर्वाधिक उत्पन्न देणारा जिल्हा असल्याने येथे अधिक तलाठ्यांची गरज आहे. नव्या भरतीमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पडेल.

सध्या पुणे जिल्ह्यात एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. त्यामुळे सर्व कामे वेळेत पूर्ण करणे अवघड जात आहे. नवीन भरती झाल्यानंतर प्रत्येक गावासाठी स्वतंत्र तलाठी नेमण्यात येणार असल्याने लोकांची कागदपत्रे आणि जमीनसंबंधी कामे जलदगतीने पूर्ण होतील.

मोठी बातमी : जि.प. आचारसंहिता १५ किंवा १६ नोव्हेंबरला. ZP Election update 2025

Talathi Bharti 2025 अंतर्गत अर्ज प्रक्रिया डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. अर्जाची नेमकी तारीख, परीक्षा पद्धत आणि इतर महत्त्वाच्या तारखा लवकरच महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येतील. या भरतीमुळे अनेक तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार असून, ग्रामीण भागातील प्रशासनिक व्यवस्था अधिक बळकट होईल.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment