राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला.Maharashtra Cabinet Decision

Maharashtra Cabinet Decision:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet) आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. त्यामध्ये, 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सहकारी, विधि व न्याय, वित्त विभाग आणि जलसंपदा विभागासाठी 2 असे एकूण 5 निर्णय घेण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कुणाचा समावेश?Maharashtra Star Pracharak Yadi 2025

मंत्रालयातील आजच्या बैठकीतील मंत्रिमंडळ निर्णय

(सहकार विभाग)

नाशिक, नागपूर व धाराशिव या जिल्हा मध्यवती सहकारी बँकांना ८२७ कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल

(विधि व न्याय विभाग)

न्यायालयीन संकुले तसेच न्यायाधिशांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेत वाढ. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता खर्च तरतुदीस मान्यता

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ठेवीदारांना फक्त 5000 रुपये काढता येणार, जाणून घ्या कारण. RBI On Maharashtra Co.Opretaive Bank Strike

(वित्त विभाग)

पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता. अंमलबजावणीचा कालावधी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत राहणार

(जलसंपदा विभाग)

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्पासाठी ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता

(जलसंपदा विभाग)

हिंगोली जिल्ह्यातील सुकळी साठवण तलाव (ता. सेनगाव) प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी

भीमाशंकरसह विविध तीर्थक्षेत्र संदर्भाने बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या विकासासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर ! Uddhav Thackeray Star Campaigners Election 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील भाविक नियमितपणे ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येतात, हे लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा. मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे गतीने पूर्ण करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा.

या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment