Petrol Diesel Price: अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे आणि प्रमुख तेल उत्पादक देशांकडून पुरवठा कमी होण्याच्या शक्यतेमुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
या संभाव्य दरवाढीचा सामना करण्यासाठी, भारत सरकारने आपल्या रणनीतिक तेल साठ्यांमध्ये मोठी वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या तेलाच्या किमती तुलनेने कमी असल्याने, भारत या संधीचा फायदा घेऊन आपल्या ऊर्जा सुरक्षेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
किंमत कमी, संधी मोठीमे महिन्यात कच्च्या तेलाची किंमत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर (६० डॉलर प्रति बॅरल) होती, जी जूनमध्ये ७६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली होती. सध्या ब्रेंट क्रूड ६५ डॉलर प्रति बॅरलच्या खाली व्यवहार करत आहे.
२१ नोव्हेंबरपासून रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकोइलसारख्या मोठ्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लावण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक पुरवठा कमी होऊन किंमती वाढू शकतात. याच पार्श्वभूमीवर भारत सरकार सध्याच्या स्वस्त दराचा फायदा घेऊन आपल्या रणनीतिक पेट्रोलियम साठ्यांमध्ये तेल साठा आणि त्याचा विस्तार करण्याची तयारी करत आहे.
फक्त 5 मिनिटात रेशन कार्ड डाऊनलोड करा, सोपी ट्रिक जाणून घ्या.Ration Card In Digilocker
भारताची सध्याची क्षमता आणि विस्तार योजनासूत्रांच्या माहितीनुसार, इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह्स लिमिटेड आणि सरकार खरेदी प्रक्रिया वेगाने पुढे नेत आहेत. ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारताची एकूण भूगर्भीय साठवण क्षमता ५.३ दशलक्ष टन आहे.
सध्या केवळ ३.६ दशलक्ष टन तेल भरलेले आहे. भारतात सध्या तीन ठिकाणी तेल साठे आहेत, पण आता दोन नवीन साठवण केंद्रे उभारण्याची योजना आखली जात आहे. ही नवीन केंद्रे तयार झाल्यावर देशाची एकूण रणनीतिक साठवण क्षमता दुपटीहून अधिक होईल, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जा संकट हाताळण्यास मदत होईल.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा