Flour mill Scheme : सध्या ही योजना बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाहीर झाली आहे, पण लवकरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
१. तुमच्या जिल्ह्यात योजना सुरू झाली आहे की नाही, हे कसे तपासावे?
ही योजना तुमच्या जिल्ह्यात सुरू झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करू शकता:
गुगल सर्च करा: तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि ‘झेडपी’ (ZP) एकत्र टाका.
उदाहरणार्थ: तुम्हाला पुणे जिल्ह्याचा तपास करायचा असल्यास, Google वर ZP Pune किंवा जिल्हा परिषद पुणे असे सर्च करा.
अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्च रिझल्टमध्ये दिसणाऱ्या तुमच्या जिल्हा परिषदेच्या (उदा. zppune.maharashtra.gov.in) अधिकृत वेबसाइटवर जा.
‘सूचना’ किंवा ‘जाहिरात’ विभाग तपासा: वेबसाइटवर तुम्हाला “सूचना” (Notifications), “जाहिरात” (Advertisements) किंवा “नवीनतम अद्यतने” (Latest Updates) असे विभाग दिसतील. या विभागांमध्ये “अपंग महिलांना पिठाची गिरणी पुरवणे” किंवा “योजना जाहिरात” अशी कोणती जाहिरात आली आहे का, हे तपासा.
लवकरात लवकर अर्ज सुरू होण्याची शक्यता असल्याने, नियमितपणे तपासणी करा.
२. पिठाची गिरणी (मोफत चक्की) योजनेसाठी पात्रता
पिठाची चक्की खरेदीसाठी मिळणारे १००% अनुदान (डीबीटीद्वारे थेट खात्यात) मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

३. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यावर तुम्हाला खालील ‘पाच’ कागदपत्रे (सर्व जिल्ह्यांमध्ये कॉमन) तयार ठेवावी लागतील:
आधार कार्ड (Aadhaar Card)
अपंगाचे प्रमाणपत्र (अपंगाचा सर्टिफिकेट)
उत्पन्नाचा दाखला (पतीच्या किंवा स्वतःच्या नावाचा)
रहिवासी दाखला (तहसील कार्यालयाचा)
बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट असावा)
वयाचा दाखला (उदा. शाळा सोडल्याचा दाखला – TC)
४. पिठाची गिरणीसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
अर्ज भरण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे.
जाहिरात व फॉर्म मिळवा: तुमच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवरून योजनेची जाहिरात (प्रेस नोट) आणि त्यासोबत जोडलेला अर्ज (फॉर्म) डाऊनलोड करा.
अर्ज भरा:
फॉर्ममध्ये महिलेचा फोटो लावा.
महिलेचे संपूर्ण नाव, वडिलांचे/पतीचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, मुक्काम पोस्ट, तालुका, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक (IFSC कोडसह) यासारखी सर्व वैयक्तिक माहिती भरा.
फॉर्ममध्ये दिलेल्या अटी-शर्ती (पात्रता निकष) व्यवस्थित वाचून घ्या.
सही करा: फॉर्मवर अर्जदाराची सही आणि पालकांची सही आवश्यक ठिकाणी करा.
कागदपत्रे जोडा: वरील यादीतील सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडा.
अर्ज सादर करा (Verification):
तयार केलेला हा अर्ज सर्व कागदपत्रांसह तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयात नेऊन सादर करा.
सादर केल्यानंतर, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि विस्तार अधिकारी/परिवेक्षिका यांच्याकडे जाऊन तुमच्या अर्जाची पडताळणी करून घ्या आणि त्यांच्या सही-शिक्क्याची नोंद अर्जावर करून घ्या.
सर्व पडताळणी पूर्ण झाल्यावर, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी (DBT – Direct Benefit Transfer) मार्फत योजनेच्या रकमेचा लाभ दिला जाईल.
तुम्हाला अर्ज भरताना काही अडचण आल्यास तुम्ही नक्की कमेंट करू शकता.