अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, ‘या’ तारखेला होणार नगरपंचायत व नगरपरिषदेची निवडणूक. Election Commission PC

Election Commission PC: राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.

गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.

या’ योजनेतून 100 टक्के अनुदानावर चार एकर जमीन मिळतेय, वाचा योजनेची संपूर्ण माहिती.Land Agriculture Scheme

राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. १० डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५मतदान – २ डिसेंबर २०२५मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५निकाल जाहीर करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५

मोठी बातमी 2026 च्या सरकारी सुट्ट्या जाहीर! पहा संपूर्ण यादी पहा. Government Holiday List Announcement 2026

नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक आकडेवारी…

राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६,८४९ सदस्यांची व २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. यंदा १० नव्या नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. तर, २३६ नगर परिषदांची मुदत संपली आहे. तसेच राज्यातील ४७ पैकी पाच नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. तर उर्वरित ४२ नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. यापैकी २७ नगर पंतायतींची मुदत संपली असून १५ नव्या नगरपंचायतींची यंदा भर पडली आहे.

PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये PM Kisan 21st installment

मतदारांच्या मदतीसाठी निवडणूक आयोगाचे मोबाईल अॅप

दरम्यान, मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील सर्च सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधता येईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. मात्र, त्याचबरोबर मोबाईल अॅपदेखील विकसित केल्याचं ते म्हणाले. त्याद्वारे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, उमेदवाराविषयी माहिती, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती, शिक्षणाविषयी, आर्थिक स्थितीविषयी मतदारांना माहिती मिळू शकेल.

उमेदवारांना खर्चाची मर्यादा वाढवली!

या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्चमर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment