मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घोषणा पुढील आठवड्यात! Maharashtra Local Body Elections update 2025

Maharashtra Local Body Elections update 2025 : राज्यातील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे.

५ किंवा ६ नोव्हेंबरला राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समिती, तसेच २४७ नगर परिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल. ३ किंवा ४ डिसेंबर रोजी नगर परिषदा-नगर पंचायतींसाठी मतदान, तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी ८ किंवा ९ डिसेंबर रोजी मतदान होईल. तर या दोन्हींची मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जवळपास सर्व तयारी झाली आहे. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय योजना आखली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून आढावा घेतला आहे. राज्य सरकारने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे.

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम.SSC, HSC Board Exam 2026 Schedule

राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याची तयारी केली आहे. पहिल्या टप्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील,

तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल. ११ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील सर्व निवडणुकीचा कार्यक्रम संपलेला असेल, असे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

आत्महत्येएवजी एक योजना आखली”, मुंबईत १७ मुलांचं अपहरण करणाऱ्या रोहित आर्यचा व्हिडीओ व्हायरल; “म्हणाला, माझ्याबरोबर.Mumbai Powai Children Hostage News

पहिला टप्पा (संभाव्य)

६ नोव्हेंबरला निवडणुकीची घोषणा

३ डिसेंबरला नगर परिषद, नगर पंचायत मतदान

९ डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान

११ डिसेंबरला दोन्ही निवडणुकीची मतमोजणी

दुसरा टप्पा (संभाव्य)

१० डिसेंबरदरम्यान महापालिका निवडणुकीची घोषणा

७ जानेवारीला सर्व २९ महापालिकांसाठी मतदान

९ जानेवारीला मतमोजणी

११ जानेवारीला निवडणूक कार्यक्रम संपेल.

या ठिकाणी पार पडणार निवडणूक

महापालिका

२९

नगर परिषदा

२४६

नगर पंचायती

४२

जिल्हा परिषदा

३२

पंचायत समित्या

३३६

७ जानेवारीला २९ महापालिकांसाठी मतदान

मुंबई महापालिके सह राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच दिवशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल.सर्व महापालिकांसाठी एकाच दिवशी म्हणजे ७ जानेवारीच्या आसपास, तर ९ किंवा १० जानेवारीला मतमोजणीची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment