दिवाळी निमित्त अतिवृष्टी व पुर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR निर्गमित दि.18.10.2025 Government decision on heavy rainfall subsidy

Government decision on heavy rainfall subsidy: राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत…

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दि.२७.०३.२०२३ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने दि. ३०.०१.२०१४ अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उघाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच, दि.२२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करा

२. खरीप २०२५ व या पुढील कालावधीकरीता केंद्र / राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक २७.०३.२०२३ प्रमाणे देय राहील, असा निर्णय दिनांक ३०.०५.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २७.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्र. ४ ते ७ येथील पत्रान्वये माहे सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूर” यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment