राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू. Heavy Rainfall Damage Compensation 2025

Heavy Rainfall Damage Compensation 2025: अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यांसाठी ४८० कोटी ३७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशीम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे.

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025 ऑनलाईन पद्धतीने अशी करा कागदपत्रे अपलोड.Solar Powered Knapsack Spray Pump 2025

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे.

अमरावती विभागातीलअकोला जिल्ह्यासाठी ९१ कोटी १२ लाख ५८ हजारबुलढाणा जिल्ह्यासाठी २८९ कोटी २७ लाख २८ हजारवाशीम जिल्ह्यासाठी ३४ कोटी ६४ लाख ८४ हजारजालन्यासाठी ८३ लाख ८४ हजारहिंगोलीसाठी ६४ कोटी ६१ लाख ८३ हजारअशी एकूण ४८० कोटी ५० लाख ३८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक भांडी संच योजना, ऑनलाइन अर्ज सुरू, असा भरा ऑनलाईन फॉर्म, मोफत १० वस्तू संच, Essential Kit Bhandi Online Form Appointment

◼️ वरील जिल्ह्यांतील ५ लाख ३७ हजार ३७८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी ६ लाख ७२ हजार ८६६ शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.◼️ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येत आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment