आनंदाची बातमी! आजपासून आठवा वेतन आयोग लागू; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? वाचा सविस्तर.8th Pay Commission Applicable Today

8th Pay Commission Applicable Todayआठवा वेतन आयोग आजपासून लागू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. तुमचा पगार कितीने वाढणार हे जाणून घ्या.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी: कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग आजपासून लागू झाला आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. यामुळे कर्मचारी, पेन्शनधारकांना खूप फायदा होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन २०२६ पासून लागू झाला आहे. दरम्यान, आता नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ येण्यास उशिर होणार आहे.

शेतकऱ्यांच्या २ लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, शासन आदेश जारी | Farmer Loan Stamp Duty Waived GR

काही दिवसांनी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळेल. यासाठी शिफारसी सादर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी १८ महिन्यांचा वेळ दिला आहे.

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)

आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. मिडिया रिपोर्टनुसार, जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार १८००० रुपये असेल तर तो वाढून ५१,४८० होऊ शकतो.

आठवा वेतन आयोगाअंतर्गत ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सरकार दर १० वर्षांनी वेतन आयोग लागू होतो. याआधी २०१६ मध्ये ७वा वेतन आयोग लागू झाला होता.

८वा वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Level 1-18 Employees Salary Hike)

नवीन वेतन आयोगात बेसिक सॅलरीत जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.

लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा पगार १८००० रुपयांवरुन ३८,७०० रुपये होईल.

लेव्हल २ मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार २९,२०० रुपयांवरुन ६२,७८० रुपये होईल.

लेव्हल १० मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार ५६,१०० रुपयांवरुन १,२०,६१५ रुपये होण्याची शक्यता आहे.

लेव्हल १५ मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार १,८१,२०० वरुन ३,९१,७३० रुपये होण्याची शक्यता आहे.

लेव्हल १८ पदांसाठी कर्मचाऱ्यांचा पगार २,५०,००० रुपयांवरुन ५,३७,५०० रुपये आहे.

मोठी बातमी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 02/ 01/ 2026 रोजी 05 शासन निर्णय जाहीर New Shasan Nirnay GR Today

Leave a Comment