8th Pay Commission 2025:नवीन आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 38 टक्के वाढ होणार आहे. तर पेन्शनमध्येही सुमारे 34 टक्के वाढ होणार असल्याचे समजते. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे सातवा वेतन आयोगातील 2.57 पट फिटमेंट फॅक्टरनुसार निश्चित केले गेले आहे. या प्रमाणे, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतन 18,000 रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 15,000 रुपये इतके आहे.
आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवून 2.68 पट करण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूलभूत वेतनात किमान 6,000 रुपयांची वाढ होईल, तर उच्च वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वेतन तब्बल 46,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.
8th Pay Commission : काय सांगता? आठव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचारी ‘या’ भत्त्यांना मुकणार
फक्त वेतनच नाही तर, या वाढीचा थेट फायदा सेवानिवृत्ती उपदान (ग्रॅच्युइटी) आणि इतर भत्त्यांवरही होईल. अंदाजानुसार, उपदानामध्ये जवळपास 2.5 पट वाढ होईल. तसेच पेन्शनमध्येही सुमारे 34 टक्के वाढ होऊन निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे.
नवीन आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात मोठा बदल होणार आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा