दहावी-बारावी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाइन; आता हेलपाटे थांबणार स्पीड पोस्टचाही पर्याय : सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी ५०० रुपये शुल्क निश्चित. 10th 12th Old Board Certificate Online Download 

10th 12th Old Board Certificate Online Download: राज्य बोर्डाच्या दहावी-बारावीच्या मार्कशीट, डुप्लिकेट प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागायचे. पण, ही गैरसोय आता संपणार आहे.

राज्य मंडळाने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वप्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी एकसमान ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून ‘आधार’वर आधारित ओटीपीद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सन १९९० पासूनचा सर्व डेटा डिजिटल स्वरुपात उपलब्ध करण्यात आला आहे.

मोठी बातमी विकलेल्या जमिनी परत मूळ मालकांच्या नावे होणार Land Record Maharashtra Update

त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र सहज मिळू शकणार आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रमाणपत्राची मूळ प्रत पोस्टाद्वारेही घरपोच मिळणार असल्याने मंडळात जाण्याची गरज पूर्णपणे टळणार आहे.

डुप्लिकेट मार्कशीटची प्रक्रिया ऑनलाइन

दहावी-बारावीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र हरविले, खराब झाले किंवा दुरुस्तीची गरज असल्यास यापुढे मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करण्याची गरज राहणार नाही. सर्व अर्ज व पडताळणीची प्रक्रिया मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी 07 दिवस मुदतवाढ शेवटची तारीख… Maha police Bharti 2024-2025

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

निकालानंतर प्रवेश प्रक्रियेदरम्यान किंवा नोकरीसाठी तातडीने कागदपत्रे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे विलंब सहन करावा लागणार नाही. घरबसल्या दस्तऐवज मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांना बोर्डात चकरा मारायची गरज नाही

सही, शिक्के, शाळेची शिफारसपत्र, ओळख पडताळणी, कर्मचाऱ्यांशी संपर्क असा संपूर्ण त्रास टळणार आहे. स्वयंपूर्ण डिजिटल प्रक्रियेने मंडळाच्या भेटी पूर्णपणे बंद होतील.

‘आधार’वर आधारित ओटीपीने ऑनलाइन अर्ज

अर्जदाराचे प्रमाणिकरण ‘आधार’ क्रमांक टाकल्यावर मिळणाऱ्या ओटीपीद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची प्रत घेऊन जाण्याची आवश्यकता नाही.

महिलांना सरकारी योजनेतून मिळणार गॅरंटीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज; अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस Udyogini Loans Yojana

सही-शिक्के, शाळेच्या शिफारसपत्राची गरज नाही

यापुढे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शाळेचे ओळखपत्र, शिफारसपत्र, हजर राहण्याच्या नोंदी अशा कोणत्याही कागदपत्रांची गरज राहणार नाही. संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आणि डिजिटल आहे.

सन १९९० पासूनचा डेटा ऑनलाइन

बोर्डाने मागील ३५ वर्षाचा डेटा डिजिटल करून प्रणालीमध्ये उपलब्ध केला आहे. त्यामुळे १९९० नंतर बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळण्याची खात्री आहे.

सर्व प्रमाणपत्रांसाठी आता एकसमान शुल्क

पूर्वी विभागनिहाय वेगवेगळे शुल्क आकारले जात होते. आता सर्वप्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी राज्यभर एकच शुल्क ५०० रुपये लागू होईल.

ऑनलाइन प्रमाणपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment