02 important government decisions issued regarding state employees:1) शासन निर्णय १: सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहायक अनुदान हिस्सा वितरीत करणेबाबत.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एल-२, प्रधानशीर्ष २०५३ जिल्हा प्रशासन ०७ मानधन व इतर भत्ते यासाठी अनुदाने (०७) (०१) ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने (२०५३ १०४२) वेतनेतर, ३१ सहायक अनुदाने अंतर्गत वित्त विभागाने मूळ अर्थसंकल्पीय तरतूद रु.६०९.४२ कोटी इतका मंजूर केला आहे. तद्नंतर ग्रामपंचायत कर्मचारी यांचे दि.१.९.२०२० ते ३१.३.२०२२ पर्यन्तची सुधारित किमान वेतनातील थकबाकी अदा करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात रु.४००,०० कोटीची पुरवणी मागणी मंजूर केली.
तसेच सरपंच व उपसरंपच यांच्या मानधनात शासन निर्णय दि. २४.०९.२०२४ अन्वये वाढ करण्यात आल्याने व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे इतर थकबाकी अदा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात रु.१२८.२४ कोटींची पुरवणी मागणी मंजूर केली आहे. त्यानुसार सन २०२४-२५ साठी एकूण रु.११३७.६६ कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी वित्त विभागाने रु.९९७,२३,१६,०००/- इतका निधी बीडीएस वर उपलब्ध करुन दिला असून सदर निधी. शासन निर्णय डाउनलोड येथे करा
2) शासन निर्णय : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर-२०२४ ते फेब्रुवारी-२०२५ या कालावधीतील वेतनासाठी निधी वितरीत करण्याबाबत…
सेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्हयात राबविण्यास संदर्भ क्र. १ वरील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला सन २०२२-२३ ते सन २०२७-२८ पर्यंत मुदतवाढ देऊन योजनेची व्याप्ती राज्यभर वाढवून डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” असे संबोधण्यास संदर्भ क्र.२ वरील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सं.क्र.४ येथील पत्रान्वये, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनवर प्रतिनियुक्तीद्वारे कार्यरत असलेल्या सात अधिकारी व कर्मचारी यांना सप्टेंबर-२०२४ ते फेब्रुवारी-२०२५ या कालावधीतील वेतन अदा करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यास अनुसरुन सदर अधिकारी /कर्मचाऱ्यांना सप्टेंबर-२०२४ ते फेब्रुवारी-२०२५ या कालावधीतील वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-१. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या अंमलबजावणीसाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या प्रकल्प संचालक-१, कृषी उपसंचालक (वर्ग-१)१, तंत्र अधिकारी (वर्ग-२) ५ या सात अधिकारी / कर्मचारी यांना सप्टेंबर-२०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीतील वेतन अदा करण्यासाठी मागणी क्र. डी-३ खालील “डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनसाठी मिशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट बोर्ड यांना सहायक अनुदान (कार्यक्रमांतर्गत)” या योजनेसाठीच्या लेखाशीर्ष (२४०१ ए९३१), ३६-सहाय्यक अनुदाने (वेतन) या लेखाशीर्षाखाली रुपये रु.४१,६२,८२४/- (रुपये एकेचाळीस लाख बासष्ठ हजार आठशे चोवीस फक्त) इतका निधी जिल्हा अधिक्षक व कृषि अधिकारी, अकोला यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. या प्रित्यर्थ होणारा खर्च उपरोक्त लेखाशीर्षांखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांत करीता मंजूर केलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.
3. सदर योजनेच्या राज्यस्तरीय अंमलबजावणीकरीता जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, अकोला यांना योजनेचे नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा अधिक्षक व कृषि अधिकारी, अकोला यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
५. प्रस्तुतचा शासन निर्णय वित्त विभागाने अनौ. संदर्भ क्रमांक १६७/२०२५/व्यय-१ दिनांक २९.५.२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३३११५१०३१०२०१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा