Wire compound scheme 2025:महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे पिके वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकरी कमी खर्चात आपल्या शेतीभोवती तारांचे कुंपण उभारू शकतात आणि जंगली डुकरं, निलगाय, ससा यांसारख्या प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करू शकतात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
किती मिळते अनुदान?
या योजनेअंतर्गत सरकारकडून काटेरी तार व लोखंडी खांबांसाठी आर्थिक मदत दिली जाते. हेक्टरनुसार अनुदानाचे प्रमाण वेगवेगळे आहे :
१ ते २ हेक्टर शेतीसाठी – ९०% अनुदान
२ ते ३ हेक्टर शेतीसाठी – ६०% अनुदान
३ ते ५ हेक्टर शेतीसाठी – ५०% अनुदान
५ हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी – ४०% अनुदान
यामध्ये उरलेली रक्कम शेतकऱ्याने स्वतः भरायची असते.
योजनेच्या महत्त्वाच्या अटी
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
शेती स्वतःच्या मालकीची किंवा भाडेपट्ट्याने घेतलेली असावी.
शेतीवर अतिक्रमण नसावे.
शेती वनक्षेत्राच्या हद्दीत नसावी.
पिकांचे नुकसान झाल्याचा पुरावा आवश्यक आहे.
ग्रामविकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संमती घेणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे
शेतकरी ओळख क्रमांक (Mahadbt साठी)
जात प्रमाणपत्र
बँक पासबुक (आधार लिंक केलेले खाते)
ग्रामपंचायतीचा दाखला
समितीचा ठराव
जर शेतीत अनेक मालक असतील तर इतर मालकांची संमतीपत्रे
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीत प्रत्यक्ष जाऊन अर्ज करता येतो. तसेच, इच्छुक शेतकरी ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात. त्यासाठी Mahadbt Portal या शासकीय संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागतो.