8th Pay Commission : खासगी क्षेत्रातील (Private sector job) कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणं वर्षाला होणाऱ्या पगारवाढीची (Appraisal) ची अपेक्षा असते, त्याचप्रमाणं (Government Jobs) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असते ती विविध भत्ते आणि वेतन आयोगांची. पण, याच वेतन आयोगामुळं केंद्र सरकारी कर्मचारी काहीससे चिंतेत येऊ शकतात. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या आठव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेची प्रतीक्षा आहे त्याच वेतन आयोगावरून आता काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरसमवेत उपस्थित होणारे आणखी काही प्रश्न म्हणजे, नवा वेतन आयोग लागू झाल्यास नेमके किती भत्ते रद्द होणार आणि किती पगारवाढ मिळणार? सातव्या वेतन आयोगावर नजर टाकल्यास 196 अलाऊंन्सचा आढावा घेण्यात आला होता. यापैकी 52 भत्ते रद्द करत 36 इतर भत्ते समाविष्ट करण्याची शिफारस करत नव्या वेतन आयोगाची आखणी करण्यात आली होती. जाणकारांच्या मते 8 व्या वेतन आयोगाच्या अधिसूचना प्रक्रियेदरम्यानही ही प्रक्रिया केली जाऊ शकते जिथं, कमी भत्ता- अधिक पारदर्शिकता अशा सूत्रावर काम केलं जाऊ शकतं.
कोणते भत्ते प्रभावित होणार?
तज्ज्ञांच्या मते सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रवास भत्ता, स्पेशल ड्यूटी अलाऊंस, स्थानिक भत्ते आणि काही विभागीय भत्त्यांमध्ये टायपिंग/ क्लर्क भत्ते रद्द केले जाऊ शकतात. डिजिटलायजेशन आणि नव्या प्रशासकीय प्रणालीमुळं वरील भत्ते रदद् करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
पगारावर कसा होणार परिणाम?
भत्त्यांमध्ये कपात होणं म्हणजे त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणं. सहसा सरकारकडून कर्मचाऱ्यांना मूळ वेतन आणि DA (Dearness Allowance) वाढवून देत भत्ते कमी करण्यावर भर दिला जातो. याच प्रक्रियेतून आर्थिक संतुलन राखता येतं. ज्यामुळं पेन्शन लाभार्थींनाही याचा फायदा घेता येतो. त्यामुळं आता सरकारकडून हे संतुलन राखण्यासाठी नेमकी कोणती समीकरणं विचारात घेतली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, अद्यापही शासनानं 8 व्या वेतनाची अधिकृत अधिसूचना जारी केली नसून आयोगाच्या Terms of Reference (ToR), अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रियासुद्धा प्रलंबित आहे. Terms of Reference (ToR) कडूनच वेतन आयोगाची संरचना, भत्ते आणि इतर शिफारसींसंदर्भातील निर्मय घेतला जाणार असून या वेतन आयोगाच्या रचनेकडेच सर्वांचं लक्ष असेल.
आठवा वेतन आयोग काय आहे आणि तो कधी लागू होणार?
आठवा वेतन आयोग हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शन पुनर्रचना करण्यासाठी स्थापन केले जाणारे आयोग आहे. सध्या त्याची अधिकृत अधिसूचना जारी झालेली नाही, परंतु अंदाजे तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय आणि त्याचा पगारावर कसा परिणाम होईल?
फिटमेंट फॅक्टर हे मूळ वेतनाला चढवण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे. सातव्या वेतन आयोगात हा 2.57 होता, ज्यामुळे मूळ वेतन ₹7,000 वरून ₹18,000 झाले. आठव्या वेतन आयोगात हा 1.83 ते 2.86 दरम्यान असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पगारात 13% ते 34% वाढ होऊ शकते.
आठव्या वेतन आयोगात कोणते भत्ते रद्द होऊ शकतात?
तज्ज्ञांच्या मते, प्रवास भत्ता (Travel Allowance), स्पेशल ड्यूटी अलाऊंस, स्थानिक भत्ते आणि टायपिंग/क्लर्कसारखे विभागीय भत्ते डिजिटलायझेशनमुळे रद्द होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगात 52 भत्ते रद्द झाले होते, आणि आता ही संख्या वाढू शकते.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा